महाराष्ट्र राज्याचे लाडके तरुण तडफदार मंत्रीमहोदय ना शंभुराज देसाई साहेब . |
पाटण प्रतिनिधी, दि. १ऑगस्ट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त सामाजिक विभागाने आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री मा.उपमुख्यमंत्री मा. मंत्रीमहोदय ना . शंभुराज देसाई साहेब तसेच आर्टिचे सुनिल वारे उपस्थित होते. बार्टी च्या धरतीवर आर्टिची स्थापना व्हावी ही समस्त मातंग समाजाची मागणी होती ती मागणी प्रामुख्याने महायुती सरकारने पूर्ण करून दि.१ ऑगस्ट डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त आर्टी कार्यालयाचे उद्धाटन करून मातंग समाजाला अनमोल भे ट दिली खास करून तरुण वर्गाला नोकरी,व्यवसाय, शिष्यवृती,. इत्यांदीत जीवनमान उंचावण्यात प्रमुख पुढाकार घेवून प्रयत्न करण्यात मा नामदार शंभुराज देसाई साहेबांचा सिंहाचा वाटा आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार महासंघ प्रचार प्रमुख महाराष्ट्र राज्य तसेच ह्युमन राईट्स सदस्य मा डॉ श्री संजयकुमार बाबुराव सोनावले यांनी मत मांडले. पुढे बोलताना त्यांनी मंत्रीमहोदय ना. शंभुराज देसाई साहेबांच्या प्रती विशेष आभार व्यक्त केले. यापुढे समस्त पाटण तालुक्यातील मातंग तसेच बौध समाज बांधव साहेबांच्या पाठीशी खंभीर उभा राहणार असल्याचे सांगितले. मी स्वतः पाटणकर गटाच्या भूल थापांना बळी पडलो असून यापुढे त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही .जे कोणी समाज बांधव भरकटले असतिल त्यांना साहेबांच्या गटाच्या प्रवाहात आण
णार असल्याचे स्पष्ट मत य यावेळी बोलताना व्यकत केले .
Post a Comment
0 Comments