प्रतिनिधी, मौजे घोट ता.पाटण ग्रामपंचायत क्षेत्रातील पाचवाड्या व घोटगावठाण,ग्रामसभा ही हनुमान मंदीर येथे दि.४/०७/ २०२४ रोजी पारपाडत असताना मा. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा झाली या मध्ये प्रामुख्याने मा . नामदार शंभुराज देसाई साहेब यांनी मंजूर केलेल्या पाणंद रस्ते आराखड्या वर सविस्तर चर्चा झाली त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मा ग्रामसेवक यांनी विशेष मार्गदर्शन केले. हे विषय हाताळत असताना पहिल्यांदाच सभा कोरम अभावी तहकूब झाली नाही,गेली दीड वर्षे आलेली मरगळ झटकून आज नागरिकांनी सहभाग दाखवून सभा कोरम पूर्ण करण्यास समर्थता दर्शविली. सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना . शंभुराज देसाई साहेब यांनी तालुकात घोट गावाला सढळ हाताने भरगोस निधीची खैरात वाटल्याने कोणत्याही परस्थितीत सर्व निधी आपल्या पदरात पाडण्यासाठी गावातील तसेच पाच वाड्यातील मतदारांनी सभेला हजेरी लावून सर्व प्रस्ताव लवकरात लवकर कसे मार्गी लागतील याची खबरदारी घेतली हे करत असताना मात्र ग्रामपंचायत सदस्य उदासीन असल्याचे दिसून आले. यात विरोधक असलेल्या पाटणकर गटाचे सदस्य त्याचबरोबर मतदार या ग्रामसभेला नगन्य दिसून आले यावरून असे मानायचे की काय जवळ जवळ पाटणकर गट घोट गावातून संपतोय की काय हे या आजच्या उपस्थितीवरुन नेमके काय समजायचे हाही प्रश्न न समजण्यासारखा दिसून आला. शेवटी शिव दौलत बँकेचे संचालक मा. रणजित शिंदे यांनी मा. पालकमंत्री ना. शंभुराज देसाई साहेब यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला याला अनुमोदन ग्रा.प सदस्य शरद सावंत यांनी दिले अशा प्रकारे आज ची ग्राम सभा विरोधक नसल्याने खेळीमेळीत पारपडली यावेळी सर्व अंगणवाडी सेविका, प्राथ शिक्षक, पोलिस पाटिल,
मतदार, घोट सोसायटीचे सदस्य, व्हा . चेअरमन, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलत असताना शिवसेना तालुका प्रमुख मा. भानुदास शिंदे यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली, शेवटी आभार व्यक्त करत असताना डॉ. संजयकुमार बा सोनावले यांनी सर्व महिला, पुरुष मतदार बंधू भगिणींचे विशेष अभिनंदन केले अशा प्रकारे प्रथमतः च संवेदन शील असणार्या गावाची ग्रामसभा शांततेत पार पडल्याने सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचे दिसून आले .
Post a Comment
0 Comments