Type Here to Get Search Results !

मौजे घोट ता.पाटण येथील पंचशील तरुण मंडळ मुंबई (घोट)कडून सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे दैदीप्यमान आयोजन








 प्रतिनिधी,                                                                                         दि.23 मे  2568 व्या बुध्द पौर्णिमेनिमित्त 



 घोट येथील पंचशील तरुण मंडळ मुंबई यांनी,  लोकवर्गणीतून बांधलेल्या बौद्ध विचाराचे नामकरण सोहळा व सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव मोठ्या ऊत्साहात पार पडला.                                                                                         सकाळी महामाया बुध्द विहार असे नामकरण करण्यात आले व त्याचा बहुमान पंचशील महिला मंडळ घोट यांना मिळाला तर बुध्द विहाराचे ऊद्धाटन सामाजिक कार्यकर्ते मा.संजयकुमार बाबुराव सोनावले यांच्या हस्ते करण्यात आले तद्नंतर भगवान बुद्ध व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तिंचे पुर्नस्थापना मा.पोलिस निरीक्षक साहेबराव पवार यांच्या हस्ते व आशाताई कांबळे यांच्यासह इतर मान्यवर मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.व भोजनदान आराधना फौंडेशन उंब्रज आणि कै.शेठ बाबुराव तुकाराम सोनावले सामाजिक संस्था घोट यांच्या विद्यमानाने पार पडला.                                                                        सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली व रात्रभर सुश्राव्य अशा गायकवाड सर वसहकरी पाटण यांचा शिव-भिम गितांचा कार्यक्रम कै.शेठ बाबुराव तुकाराम सोनावले यांचे स्मरणार्थ मा.दादासो, हिराजी,संजयकुमार बाबुराव सोनावले यांनी आयोजीत करून कार्यक्रमाला रंगत आणली.कार्य क्रमान  उद्घाटन माजी उपसरपंचे मा.दादासाहेब सोनावले यांनी केले .
शेवटि अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व सदस्य यांनी सर्वांचे सत्कार व आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. अशा प्रकारे भव्यदिव्य आयोजन पुढिल वर्षी करण्याचा संकल्प मंडळाच्या  अध्यक्ष  मा.रामचंद्र पवार, सचिव मा.जिवन पवार यांनी बोलून दाखविला.

Post a Comment

0 Comments