पालकमंत्र्यांच्या च कार्यकर्त्यांनं (माईक मास्टर पुढारी म्हणून परिचित असलेल्या)अडवला ग्रामपंचायत मालकिचा रस्ता.....?
तारळे=तारळे जि प मतदार संघातील घोट गावातील मातंग समाजातील नागरिकांनी केलेल्या मागणी नुसार व सरपंच, ग्रामपंचायत, ग्रामसभा घोट यांच्या काम मागणी प्रस्तावानुसार
पालकमंत्र्यांनी अंतर्गत डांबरीकरणाचे काम मंजुर केले पण त्यांच्याच शिक्षण संस्थेत सोनावडे हायस्कूल वर परिचर पदावर काम करणार्या एका सेवकानं चक्क त्या रस्त्याच्या कामा विरोधात पाटण न्यायालयात पालकमंत्र्यांच्या पदाचा उल्लेख करून त्यांच्याच विरोधात दाद मागितल्याने पाटण विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय झाला आहे.
सदरच्या कामाची नागरिकांनी पालकमंत्री यांच्या कडे मागणी केली होती.त्या प्रमाणे मंत्री महोदयांनी ते काम डोंगरी विकास निधीतुन मंजुर केले.ते काम मंजुर होणेकामी ग्रामपंचायतीने सर्व कागदपत्र पुरवली पण मंजुरी चे सोपस्कार पुर्ण होताच त्या कामाचा सा.बां.विभागा कडुन त्या कामाच कार्यारंभ आदेश पण निघाला आणि पालक मंत्री यांच्या बंधुंच्या शुभहस्ते त्या कामाचा शुभारंभ पण झाला पण हा रस्ता झाला तर आपले अतिक्रमण काढावे लागणार आणि ते जर काढले तर आपल्या सुनबाई सरपंच पदांवरून अपात्र होणार आणि त्या होऊ नये म्हणून त्या सेवकाने चक्क पाटण न्यायालयाचे दार ठोठावले आहे.न्यायालयाने काम बंद करण्याचा कोणताही आदेश दिला नसताना व कोणतेही कागदोपत्री पुरावे सादर न करता सर्व मातंग समाजातील जनतेला वेठीस धरून त्या सेवकाने काम सुरू करू दिले नाही.त्याच्या पुढे सा बां विभागाचे व पोलिस प्रशासनाचे अधिकारी पण त्या सेवका पुढे हतबल झाल्याचे पहावयास मिळाले.पालकमंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा व पालकमंत्र्यांच्या बंधुंच्या हस्ते होणार्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमा वर बहिष्कार टाकुन सरपंच गटाने व एका सेवकाने पालकमंत्र्यांच्या विरोधात जान्याचा बहुमान मिळवला याची पाटण तालुक्यात खमंग चर्चा सुरू आहे.
तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून घोट ता.पाटण येथील मातंग समाजातील नागरीकांना न्याय मिळवून ध्यावा, अन्यथा येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय समस्त समाज बांधवानी घेतलाअसल्याचे कुजबुज ऐकावयास मिळत आहे.
Post a Comment
0 Comments