प्रतिनिधी, ऐतिहासिक वारसा असलेल्या मौजे घोट ता.पाटण येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू महादेव यात्रेस अत्यंत उत्साहात सुरुवात झाली असून पालखी सोहळ्यास(छबिना) मध्यरात्रीनंतर सुरुवात होवून पहाटे पर्यंत देव देवतांच्या साशन काठ्या व महादेवाची मानकर्यांकडून तसेच गावातील सर्व समाजातील भाविकांकडून भव्य मिरवणूक वाजत गाजत गावातून काढून आनंद साजरा केला जातो. तसेच यात्राकमेटि,ग्रामपंचायत, गावातील राजकीय, सामाजिक कार्य करीत असलेले सुजाण नागरिक एकत्र येऊन विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून यात्रेची शोभा वाढवतात, पै-पाहून्यांचा पाहूनचार करून अत्यंत आनंदी वातावरण हा उत्सव पार पडतो. गत वर्षात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या वर्षी सुश्राव्य भजन गायन ,मनोरंजनपर लोकनाट्य तमाशा तसेच कोल्हापूरचा प्रशिध्द असलेल्या वैभव ऑर्केस्ट्रा च्या कार्यक्रमाचे आयोजन करून यात्रेस आणखी रंगत निर्माण केली असल्याने तारळे विभागातून घोट ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले जात आहे. असेच गावाचे वैभवात भर पडून गाव उत्तरोत्तर विकासाच्या,प्रगतीच्या मार्गाची कास धरून एक आदर्श गाव म्हणून नावलौकिक प्राप्त करेल अशी प्रार्थना श्री स्वयंभू महादेव चरणी भाविक ,ग्रामस्थ करताना दिसत आहेत
.
Post a Comment
0 Comments