प्रतिनिधी, मौजे घोट तस एक आदर्श गाव, गावातील वातावरण तस राजकिय द्रष्ट्या सतत गरमा गरम परंतू धार्मिक दृष्ट्या नावाजलेल . सध्या गावात एकच कुजबुज ऐकावयास मिळतेय ती म्हणजे गावातील अवैध दारू विक्री ला कोणाचे पाठबळ, अनेक वेळा या विरूद्ध महिलांनी आवाज ऊठवून देखील दारूबंदी होत नसल्यास आम्ही महिलांनी दाद कोणाकडे मागायची अशी तीव्र भावना महिला व्यक्त करताना दिसत आहेत. गत वर्षात गावातील ग्रामपंचायत निवडणूक झाली यामधे महिला आरक्षण असल्याने महिला सरपंच झाल्या त्याच बरोबर उपसरपंच निवडितही महिलाच उपसरपंच झाल्या, गावातील महिलांच्या दारूबंदि विषयि आशा पल्लवित झाल्या, महिलांना वाटल आपले दुख दूर करण्यात चांगलीच मदत होईल, एक महिलाच दुसर्या महिलेची व्यथा समजू शकते परंतू झाल पूर्ण ऊलूट वेळोवेळी लेखी तक्रार करून देखील कोणीच दाद देत नसल्याने महिलानी ग्रामपंचायत कडे दारू बंदी विरोधात विशेष ग्रामसभा बोलविण्यासाठिचे लेखी पत्र मा.सरपंच तसेच मा.ग्रामसेवक यांचे कडे दिले आहे. यामधे गावची यात्रा दि24-25फेब्रुवारीला होवू घातल्याने घरामधे या अवदशे मुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने यात्रेच्या आत याला कठोर निर्णय घेऊन दारू बंदीला पायबंद घातला पाहिजे अशी माफक भावना एकिकडे महिलांतून ऐकावयास मिळतेतर काही महिलांतून या दारू धंदेवाईकांना ग्रामपंचायत सदस्य यांचेच पाठबळ असल्याचे बोलले जात आहे .
जर येत्या दोन ते तीन दिवसात याचा निर्णय झाला नाही तर आम्ही महिला, नवनियुक्त जिल्हापरिषद मुख्य कार्य कारी अधिकारी एक महिला असलेने त्यांच्याकडे दाद मागणार आहोत अशी भावना महिलांनी बोलताना व्यक्त केली.
Post a Comment
0 Comments