प्रतिनिधी, मौजे घोट ता.पाटण येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री स्वयंभू महादेव यात्रेनिमित्त, प्रसिद्ध महादेव मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर व इतर मंदीरांना रंगरंगोटी करण्यात येत असून गत वर्षी दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार कार्यक्रम कलशारोहन कार्यक्रम उत्साहात पार पडला होता. या वर्षी दि 23-24 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या श्री स्वयंभू महादेव यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून गावातील वातावरण उत्साहवर्धक असेल अशी माहिती मंदिर जीर्णोद्धार समितीचे मुख्य प्रवर्तक मा.श्री गोविंद शिंदे महाराज यांनी दिली.
Post a Comment
0 Comments