प्रतिनिधी, मौजे घोट ता.पाटण येथील गावातील नागरिकांमधे ग्रामसभेबाबत प्रचंड नाराजी दिसून आली.प्रजासत्ताक दिना निम्मित्त ग्रामसभा घेण्याचे परीपत्रक असताना देखील ग्रामपंचायतीच्या अनास्थेमुळे ग्रामसभेला ग्रामसेवक उपस्थित न रहाता प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक यांना सचिव म्हणून कामकाज पाहण्यास (शासनाचे कोणतेही परिपत्रक नसताना )सांगून दुसर्या गावातील मुख्य चार्ज असल्याचे कारण सांगून ग्रामसेवक अनुपस्थित राहिले तसेच बरेच ग्रामपंचायत सदस्य सुध्दा ऊपस्थित न राहिल्याने लोकांचा गैरसमज होऊन हजर असलेले लोक ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यावर वाड्यावस्त्या वरून आलेले लोक दैनंदिन जीवनातील कामकाजासाठी निघून गेले. तरी घोट गावाला कायम स्वरुपी ग्रामसेवक कधी मिळणार व लोकांनी लोक हितासाठी निवडून दिलेल्या सदस्यांना त्यांची कर्तव्य कधी समजणार व गावाची
प्रगती कधी होणार अशी कुजबुज लोंकांमधे ऐकावयास मिळाली.
Post a Comment
0 Comments